#Live अजित पवारांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात… अजित पवारांनी राजीनामा का दिला ?

लाइव्ह अपडेट्स
https://www.youtube.com/watch?v=L8Hkc3eCD-8&feature=youtu.be&fbclid=IwAR1OahZ-A8nEdD5otYoQy5WObFtQi5IHF43OS3_lQNRSuugQR1gfiRqj3xs
– अजित पवार हे नाव बँकेच्या संचालक मंडळात नसते, तर असला कुठला गुन्हाच दाखल झाला नसता हे मी छातीठोकपणे सांगतो – अजित पवार
– सार्वजनिक क्षेत्रांशी संबंधित असलेल्यांना याबद्दल माहिती असते. पण इतर १२ कोटींमधल्या किती लोकांना आम्ही उत्तरं देणार. कोणा-कोणाला सांगणार की आमचा याच्याशी काही संबंध नाही – अजित पवार
– दिवसभर काम करायचं. मरमर मरायचं आणि असे आरोप सहन करायचे. त्यामुळं मी मुलाला म्हणालो, व्यवसाय किंवा शेती बघू – अजित पवार
– आमच्या पक्षातून काही लोक गेले हे मान्य. त्यात आम्ही कमी पडलो असू. जिवाभावाचे होते. त्यामुळं आम्हाला वेदना झाल्या, पण आम्ही कधी कोणावर वैयक्तिक टीका केली नाही – अजित पवार
– स्वत:वरील आरोपांना उत्तर देताना अजित पवारांना अश्रू अनावर
– ७० हजार कोटींचा घोटाळा, हजारो कोटींचा घोटाळा. लोकांना असं वाटत असेल की अजित पवारांना हजारो कोटींशिवाय जमत नाही की काय?
– पवार साहेबांनी सांगितल्यानुसारच मी पत्रकार परिषद घेतोय. जेणेकरू माझी भूमिका मांडता येतील.
– पवार कुटुंबात कसलाही गृहकलह नाही. कुटुंब मोठं असलं तरी घरातल्या मोठ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली सर्व गोष्टी होतात – अजित पवार
– पवार साहेब सांगतील तेच आम्ही ऐकतो, हे त्रिवार सत्य आहे. – अजित पवार
– ज्या पक्षानं मला मानसन्मान दिला. त्या पक्षाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही, असं होणार नाही – अजित पवार
– मी राजीनामा दिल्यापासून एका नातलगाच्या घरी होतो. काय करावं मला कळत नव्हतं – अजित पवार
– पवार साहेबांवरील गुन्ह्यामुळं मी व्यथित झालो होतो. त्यातून राजीनामा दिला – अजित पवार
– मी बँकेच्या संचालक मंडळात होतो. त्यामुळं शरद पवारांचं नाव येत असावं असा माझा समज होता. माझ्यामुळं त्यांची बदनामी होतेय, असं वाटत होतं. – अजित पवार
– शरद पवारांचा शिखर बँकेशी दुरान्वयेही संबंध नाही. असं असताना सतत आमची नावं टीव्हीवर झळकत होती. ते मला सहन झालं नाही – अजित पवार
– वेळप्रसंगी नियमबाह्य मदत करावी लागते – अजित पवार
– शिखर बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असता तर बँक राहिलीच नसती – अजित पवार
– ज्या बँकेत साडेअकरा ते बारा हजार कोटींच्या ठेवी आहेत, तिथं २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार होईलच कसा?; अजित पवारांचा सवाल
– न सांगता निर्णय झाल्यामुळं अनेकांच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल मी कार्यकर्त्यांची माफी मागतो – अजित पवार
– विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. त्यातून माझ्या पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना वेदना झाल्या याची कल्पना आहे – अजित पवार
– अजित पवारांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात