Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तेरे लिये जानम !! : बॉय फ्रेन्डला व्यवसायात मदत करण्यासाठी घरातच केली १० लाखाची चोरी , आधुनिक “राधा ” पोलीस कोठडीत

Advertisements
Advertisements
Spread the love

बॉयफ्रेंडला व्यवसायात मदत करण्यासाठी  घरातच १० लाखांची चोरी करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या कांदिवली भागात ही घटना घडली आहे. राधा गुप्ता असे या १९ वर्षीय तरुणीचे नाव आहे. तिचा बॉयफ्रेंड आमिर नौशाद खान हा गोवंडी येथे  राहतो. कलिना भागात ही मुलगी लपून बसली होती. तिला पोलिसांनी अटक केली. बॉयफ्रेंडला व्यवसायासाठी मदत व्हावी म्हणून या तरुणीने स्वतःच्याच घरातल्या १० लाखांवर डल्ला मारला.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० ऑगस्ट रोजी या तरुणीने घरातून १० लाख रुपये चोरले आणि  ती बॉयफ्रेंड आमिर नौशाद खानसोबत पळून गेली. जेव्हा या तरुणीच्या पालकांना चोरीबाबत समजले तेव्हा त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या मुलीचा मोबाईल नंबर आणि तिच्या बॉयफ्रेंडचा मोबाईल नंबर ट्रॅक केला. त्यानंतर हे दोघे मुंबईतल्या कलिना भागात लपून बसल्याचं समजलं. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या दोघांनाही अटक केली. या मुलीकडून पोलिसांनी ७ लाख रुपये जप्त केले आहेत.

Advertisements
Advertisements

“माझ्या बॉयफ्रेंडला म्हणजेच आमिरला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्याला मदत व्हावी म्हणून मी दहा लाख रुपये चोरले ” अशी कबुली या मुलीने पोलिसांकडे दिली आहे. या दोघांची भेट आझमगढमध्ये झालेल्या एका लग्नात झाली होती. या दोघांनाही कोर्टापुढे हजर करण्यात आलं. या दोघांनाही कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!