Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ . पायल तडवी मृत्यू प्रकरण : हत्या झाली नसल्याचा फॉरेन्सिक विभागाचा अहवाल

Advertisements
Advertisements
Spread the love

नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील डीएनए चाचणीचा अहवाल फॉरेन्सिक प्रयोगशाळेने पोलिसांकडे पाठविला असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने रविवारी दिली. यात हत्या झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अंतिम अहवाल फॉरेन्सिक विभागाचे सायबर युनिट या आठवड्याभरात देणार आहे असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Advertisements

पायल तडवी  नायर रुग्णालयात पदव्यत्तर पदवीचे शिक्षण घेत होती. तिने वसतीगृहात २२ मे २०१९ गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर फॉरेन्सिक विभागाने त्या ठिकाणचे विविध नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. यात तडवीने गळफास घेण्यासाठी वापरण्यात आलेली ओढणी,नखांना लागलेले रक्त, मोबाइल फोन आणि इतरही गोष्टींचा समावेश होता. सायबर विभाग तडवी हिच्या मोबाइल फोनमधून आणखी काही पुरावे सापडतात का? याबाबत माहिती गोळा करत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट आणि ई मेलवरही काही माहिती सापडते का याचीही माहिती घेत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!