Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Good News Chandrayan 2 : संपर्क तुटलेला लँडर ‘विक्रम’ सापडला, इस्त्रोच्या प्रमुखांनी दिली माहिती

Advertisements
Advertisements
Spread the love

भारताच्या चांद्रयान मोहिमेत अखेरच्या क्षणी संपर्क तुटलेल्या लँडर विक्रम सापडले असल्याची माहिती इस्रो प्रमुख के सिवन यांनी दिली आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरचे फोटो काढले असून विक्रमशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं के सिवन यांनी सांगितलं.

Advertisements

भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला आणि लँडर विक्रम चंद्रापासून 2 किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला होता. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अपेक्षित असं यश या मोहिमेला मिळालं नसलं तरी ही मोहिम अयशस्वी ठरली असं म्हणता येणार नाही. इस्त्रोच्या सर्व संशोधकांनी केलेली मेहनत वाया गेलेली नाही. संपर्क तुटला असला तरी चांद्रयान मोहिम पुढचे एक वर्ष सुरू राहणार आहे. चांद्रयान 2 चे लँडर आणि रोव्हरशी संपर्क तुटला आहे. पण चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 2 चे ऑर्बिटर त्याचं काम करत आहे. ऑर्बिटरच्या माध्यमातून फोटो इस्त्रोला मिळत राहतील.

Advertisements
Advertisements

शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की, लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के इतकाच धक्का बसला आहे. तर 95 टक्के काम सुरू राहणार आहे. 5 टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.

ज्या रोव्हरचा संपर्क तुटला आहे तो चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर फक्त 14 दिवस काम करू शकतो. तर ऑर्बिटर मात्र एक वर्षभर काम करत राहणार आहे. ऑर्बिटर चंद्राचे अनेक फोटो काढून इस्त्रोला पाठवणार आहे. ऑर्बिटरकडून लँडरची माहिती सुद्धा मिळवता येईल. ऑर्बिटरनं लँडर विक्रमचे फोटो काढले आणि ते इस्त्रोला पाठवले तर संपर्क तुटण्याचं खरं कारण समजू शकेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!