Aurangabad : २० तोळे सोने दिले , लग्नही धूम धडाक्यात केले पण, नवरा निघाला “गे” , विवाहितेची पोलिसात धाव

औरंगाबाद – पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करणार्या व नपुसंक असणार्या पतीने “माझ्यापासून तुला मुले होणार नाहीत , मुलांची इतकीच हौस असेल तर तू परपुरुषाशी संबंध ठेव” असा अजब सल्ला देणाऱ्या पतीविरुद्ध अखेर औरंगाबाद येथे माहेरी येऊन पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे . या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पती विरोधात हुंड्यासाठी छळ व फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याविषयी पोलिसात दिलेल्या तक्रारीत सदर विवाहितेने म्हटले आहे कि , २३ जानेवारी २०१९ ला पुण्यातील एका खाजगी कंपनीत मॅनेजर असणार्या इसमासोबंत तिचे लग्न झाले होते. लोणावळ्याला हनिमूनला गेल्या नंतर पतीने तो “गे” असल्याचे पत्नीला सांगून तिच्यासोबत संबंध ठेवण्यास त्याने असमर्थता व्यक्त केली परंतु पती आपल्यासोबत विनोद करीत असल्याचे वाटले परंतु घरी परतल्यावरही पतीचे तेच ते उद्गार ऐकून पत्नीला धक्का बसला. मग लग्न का केले असे विचारले असता , मी केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी विवाह केल्याचे सांगून तुला मुला -बाळाची इतकीच हौस असेल तर तू परपुरुषासोबत संबंध ठेव असा अजब सल्ला दिला. हा सर्व प्रकार तिने आपल्या भावाला आणि आई -वडिलाना सांगितलं त्यावर तिच्या भावानेही तिच्या नवऱ्याशी संवाद साधला.
दरम्यान वस्तुस्थिती अशी असतानाही , तू नोकरी कर आम्हाला पैशाची गरज आहे आणि माहेरून पैसे आण असा तगादा लावला. शेवटी कंटाळून विवाहित मुकुंदवाडी पोलिसात या प्रकरणी रीतसर तक्रार नोंदवली.
सदर विवाहितेच्या म्हणण्यानुसार तिच्या माहेरच्यांनी तिच्या लग्नात पिडीतेच्या २० तोळे सोने देऊन मोठ्या थाटात लग्न लावून दिले होते . संसार टिकू शकला नाही. या प्रकरणी तिच्या माहेरच्यांनी जावयाशी संवाद सोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने पत्नीला माहेरच्या आणून सोडून दिले . या प्रकरणात त्याच्या आई -वडिलांनीही त्यालाच सपोर्ट करीत तिचा छळ केला . या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उध्दव जाधव यांनी पी.एस.आय. मीरा चव्हाण यांच्याकडे तपासाची सूत्रे दिली आहेत.