जालना येथील बलात्कार पीडित तरुणीच्या आरोपींना त्वरित अटक करा, भीम आर्मी संघटनेची मागणी

जालना येथून लाल डोंगर चुनाभट्टी मुंबई येथे गेलेल्या तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी तसेच मुंबईतील तपास पोलीस अधिकारी व औरंगाबाद शासकीय रुग्णालयात पिडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करावी असे निवेदन पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांना दिले. हे निवेदन वरिष्ठांना पाठवल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई होईल असे मकवाना म्हणाल्या.
संबंधीत प्रकरणा बाबत संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारे आंदोलने करून निषेध व्यक्त केला जात आहे.
या वेळी पिडितेचे वडील व भाऊ तसेच भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य माजी महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष बलराज दाभाडे, मराठवाडा प्रमुख बाळूभाऊ वाघमारे, जिल्हा सचिव निखिल खरात भारत गायकवाड , सोनू वाहुल, बुध्दभूषण शिंगारे, किरण कुमार, श्रावण दादा गायकवाड, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, दिनेश नवगीरे पवन पवार, सोमु भटकर यांची उपस्थिती होती.