Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : कंपनी व्यवस्थापकाचे घर फोडले, 17 तोळ्यांच्या दागिन्यांसह, रोकड लंपास

Advertisements
Advertisements
Spread the love

वाळुज औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या युनीट व्यवस्थापकाचे घर फोडून चोराने सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. शिवराम दास तारीचरण दास (३९, गुरुसहानीनगर प्लाट क्र. बी-१, एन-४, सिडको) असे व्यवस्थापकाचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी परिसरातील सीसी टिव्ही फुटेज हस्तगत केले आहेत. त्यावरुन चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.
गुरुसहानीनगरातील दास कुटुंबिय २५ आॅगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घराला कुलूप लावून ओरीसाला गेले होते. तेव्हापासून त्यांच्या घराला कुलूप होते. याची संधी साधून चोराने दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सात हजारांची रोकड आणि सुमारे सोळा ते सतरा तोळयांचे दागिने लांबवले. आज सकाळी दास कुटुंबिय घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार समोर आला. त्यांनी तात्काळ पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क साधला. सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्यासह कर्म-यांनी धाव घेतली. यावेळी सात हजारांची रोकड आणि पत्नीला लग्नात आलेले सोन्याचे दागिने चोराने लांबविल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनेनंतर ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक विकास खटके करत आहेत.

Advertisements

फोटो श्याम पलाये

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!