आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री !! या विषयावर काय बोलले विद्यमान मुख्यमंत्री ?

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यास शिवसेनेनं सुरुवात केली आहे. शिवसेनेचे विधानपरिषद आमदार अनिल परब यांनी नुकतंच याबाबत भाष्यही केलं आहे. ‘विधानसभा निवडणुकीत वरळीतला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत,’ असं कार्यकर्त्यांशी बोलताना अनिल परब म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे.
‘शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय?’ असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीसं तिरकस भाष्य करत करत ‘अनिल परब हे शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का?’ असा प्रतिप्रश्न विचारला आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्रिपदावरून सेना-भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच रंगणार हे स्पष्ट आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री आज नांदेड दौऱ्यावर आहेत.