लोकसभेच्या पराभवानंतरही काँग्रेस नेत्यांच्या अंतर्गत कुरबुरी चालूच

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पूर्णतः भुईसपाट झालेला असतानाही काँग्रेसमधील अंतर्गत कलह थांबायला तयार नाहीत . विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील संघर्ष उफाळून आल्याने ब्रम्हपुरी येथे बुधवारी होणारी ‘महापर्दाफाश’ सभा अखेर रद्द करण्यात आली .
विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहेत. हि सभा रद्द होण्यामागे केंद्रीय उमेदवार छाननी समितीची बैठक असल्याचे कारण विजय वडेट्टीवार यांनी पुढे केले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. असे असताना काँग्रेस पक्षातला गोंधळ संपण्याची काही चिन्हे नाहीत . राज्यातले विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हेच पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत. महत्त्वाच्या समितीतच डावलण्याने ते नाराज आहेत. हे पक्षातले राजकारण असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. त्यामुळे आधीच विस्कळीत झालेल्या काँग्रेसमध्ये अजुनही काहीही सुधारणा झालेली नाही, असेच म्हटले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच आपली निवड समिती जाहीर केली आहे. पण या समितीत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना स्थान नाही. निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या समितीतच आपले नाव नसल्याने वड्डेटीवार नाराज आहेत.
वडेट्टीवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निवड समिती माझे नाव नसल्याने आश्चर्य वाटले, यापूर्वी निवड समिती विरोधीपक्ष नेत्याचे नाव असायचे, पण यावेळी नाही. या समितीत माझे नाव नाही, हे राजकारण आहे. मला महाराष्ट्रातील मतदारसंघांची माहिती आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मनातली खदखद काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा निवड समितीत समावेश करण्यात आला होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड करण्यासाठी सोनिया गांधी यांनी एका समितीची नियुक्ती जाहीर केली होती. काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे हे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. या समितीत हरिश चौधरी, मनिकम टागोर हे सदस्य तर ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नेते के. सी. पडवी यांचा समावेश करण्यात आला आहे.