Kerala : सातवीतील विद्यार्थीनी गरोदर आढळून आली , शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

उत्तर केरळमधल्या मल्लपूरमध्ये शाळेतल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनीशी बलात्कार केला असल्याची बाब उघड झाली असून सातवीच्या इयत्तेत शिकणारी १२ वर्षांची विद्यार्थिनी गर्भवती राहिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षक गायब झाला असून, त्याचं वय ३० वर्षं आहे. वैद्यकीय चाचणीसाठी त्या विद्यार्थिनीला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी ती गर्भवती असल्याचं उघड झालं.
त्या विद्यार्थिनीचं शिक्षकानं जवळपास दोन महिने लैंगिक शोषण करून तिच्यावर सातत्यानं बलात्कार केला आहे. सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबीयांना यासंदर्भात काहीही कल्पना नव्हती. मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर कुटुंबीय आणि पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. समुपदेशनादरम्यान त्या विद्यार्थिनीनं शिक्षक वारंवार बलात्कार करत असल्याचं सांगितलं. फरार आरोपी शिक्षकावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.