धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात एकाच शेतकरी कुटुंबातील चौघांची आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच शेतकरी कुटुंबातील चार जणांनी राहत्या घरामध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. बाबाजी विठ्ठल बढे ( वय ३७) पत्नी कविता बढे, मुलगा आदित्य( १५), व धनंजय ( १२) हे चारही जण घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आज सकाळी आढळून आले. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. आत्महत्या कोणत्या कारणांमुळे केली याविषयी अद्याप माहिती मिळाली नाही. शेतकरी बाबाजी बढे यांनी पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महया केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी तपास सुरू आहे.