औरंगाबाद – शहादा बसला भीषण अपघात , १३ ठार ४० जखमी

औरंगाबादहून शहाद्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला भरधाव येणाऱ्या कंटेनरने समाेरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील १३ प्रवासी जागीच ठार झाले, तर ४० जखमी झाले. त्यापैकी ११ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री १०.४० वाजेच्या सुमारास िनमगुळ-दांेडाईचादरम्यान ही घटना घडली. जखमींना तातडीने दोंडाईचा व धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कंटेनरची धडक एवढी भीषण होती की त्यात संपूर्ण बस एका बाजूने कापली गेली. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहादा डेपाेची असलेली ही बस (एमएच २० बीएल ३७५६) दुपारी ४.१५ च्या सुमारास आैरंगाबादहून निघाली हाेती. रात्री पावणेअकराच्या सुमारास नमगुळ-दांेडाईचादरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यात संंपूर्ण बस उजव्या बाजुने कापली गेली. यात बसचालक मुकेश पाटील यांच्यासह १३ प्रवासी जागीच ठार झाले, तर अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की अवघ्या काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागली. रात्रीची वेळ व अंधार असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. घटनास्थळी शहादा येथील पालिका कर्मचारी, पोलिस व सारंगखेडा येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात हलवले.
मृतांची नावे समजली नाही
घटनास्थळी नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धाव घेऊन मदतकार्य केले. मृतांमध्ये १२ पुरुष व एका महिला प्रवाशाचा समावेश असल्याचे ते म्हणाले. रात्री उशिरापर्यंत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे कळू शकली नव्हती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रात्री १२.४५ वाजता दोंडाईचा कॉटेज रुग्णालयात सर्व मृतदेह आणण्यात आले होते. बहुतांश मृत प्रवासी हे शहादा परिसरातील असल्याचे समजते.
शहाहा बसस्थानकात नातेवाईकांची गर्दी
या घटनेचे वृत्त शहाद्यासह परिसरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे बसमधील प्रवाशांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी व शहादा बसस्थानकात धाव घेतली. बसस्थानकात रात्री १२.३० वाजता दोन हजार नागरिक जमले होते.