पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन , घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर अलर्ट , पाकिस्तानचे तीन जवान ठार

Indian Army denies Pakistan Army's claims of 5 Indian soldiers dead in ceasefire violations along the Line of Control in #JammuAndKashmir pic.twitter.com/yKiLmcrGjE
— ANI (@ANI) August 15, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या कुरापती वाढवल्या आहेत. ३७० हटवण्याला विरोध केल्यानंतर आता पाकिस्ताने काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवण्यासाठी सीमेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. पाककडून सातत्याने सीमेवर गोळीबार सुरू आहे. या गोळीबाराला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे.
भारताने दिलेल्या उत्तरामुळे पाकिस्तानचे अनेक जवान ठार झाले आहेत मात्र त्यांचे 3 जवान ठार मारल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तसेच आम्ही (पाक) देखील भारताचे 5 जवान ठार केल्याचा दावा केला आहे. भारतीय लष्कराने मात्र पाकचा हा दावा फेटाळून लावला आहे.
भारताच्या स्वातंत्र्य दिनादिवशी पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सकाळी सातच्या सुमारास गोळीबार आणि बॉम्ब टाकण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने केलेल्या या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारताने सडोतोड उत्तर दिले. यात पाकिस्तानचे काही जवान ठार झाले आहेत. पाकिस्तानकडून सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता गोळीबार करण्यात आला. स्वत: पाकिस्तानने 3 जवान ठार झाल्याचे मान्य केले आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर आणि त्याला दोन भागात विभागून केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळे पाकिस्तानने संताप सुरू केला आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला दहशतवादी कारवाया करता येणार नाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि हिंसाचार पसरवण्यासाठी पाक घुसखोरीचे प्रयत्न करत आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याची संधी मिळावी यासाठी पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. मंगळवारी रात्री देखील दहशतवाद्यांच्या एका गटाला घुसखोरी करण्यासाठी पाकने मदत केली होती. तेव्हा भारतीय जवानांनी त्यांचा डाव उधळला होता.
भारतीय लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख ले.जनरल रणबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न केले गेले आहेत. घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर अलर्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांना घुसखोरीला मदत व्हावी यासाठी पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पण त्यांचे हे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही, असे सिंह यांनी सांगितले. पुंछसह पाकिस्तानने राजौरी आणि उरी सेक्टरमध्ये देखील गोळीबार केला आहे.