लाल किल्ल्यावरून : मोदींची मोठी घोषणा; तिन्ही सुरक्षा दलांवर प्रमुख नेमणार

Our forces are India's pride.
To further sharpen coordination between the forces, I want to announce a major decision from the Red Fort:
India will have a Chief of Defence Staff- CDS.
This is going to make the forces even more effective: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 15, 2019
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक मोठी घोषणा केली. देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी या तिन्ही दलांवर एक प्रमुख (Chief of Defence Staff) नेमला जाईल, असं मोदी यांनी स्पष्ट केलं. आपल्या भाषणात मोदी म्हणाले, ‘देशाची सुरक्षा दले हा आपला अभिमान आहे. ही तिन्ही दले आणखी मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बदलत्या परिस्थितीत तिन्ही दलांमधील समन्वय वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वयक म्हणून ‘चीफ ऑफ डिफेस स्टाफ’ हे पद निर्माण केलं जाईल. या पदावरील व्यक्ती तिन्ही सैन्य दलाची प्रभारी म्हणून काम पाहील,’ असं मोदी यांनी सांगितलं.
तिन्ही सेना दलांमधील समन्वयासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स’सारखे एखादे पद असावे, अशी शिफारस सुरक्षाविषयक अनेक समित्यांनी केली होती. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. अखेर आज मोदींनी त्याबाबत घोषणा केली.