नथुराम गोडसेच्या औलादी एक दिवस माझी हत्या करु शकतात – खा. असदुद्दीन ओवेसी

Asaduddin Owaisi, AIMIM on allegations levelled against him for helping Pakistan in spreading rumours: Mujhe yakeen hai ki ek din mujhe koi goli bhi maar dega. Mujhe yakeen hai ki Godse ki jo aulaad hai vo mujhe aisa kar sakte hain. Hamare mulk mein abhi bhi Godse ki aulaad hain. pic.twitter.com/FFNkRjEtFe
— ANI (@ANI) August 14, 2019
नथुराम गोडसेला मानणारे लोक माझी हत्या करु शकतात असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. अफवा पसरवण्यासाठी पाकिस्तानला मदत करत आहात या आरोपावर उत्तर देताना ओवेसींनी हे विधान केले. एक दिवस कोणी तरी मला गोळी मारेल असे वाटते. गोडसेच्या विचारसरणीला मानणारे लोक माझ्याबरोबर असे करु शकतात. आपल्या देशात आजही गोडसेला मानणारे लोक आहेत असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या सरकारच्या निर्णयावरुन त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. उद्या तुमच्यासोबतही हे घडू शकते असे त्यांनी इशान्य भारतातील लोकांना सांगितले. मी खासदार आहे पण मी अरुणाचल प्रदेश आणि लक्षद्वीपला जाऊ शकतो का? त्यासाठी मला परवाना घ्यावा लागतो. उद्या नागालँड, मिझोराम, मणीपूर, आसाम आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्याबाबतीतही असे घडू शकते असे ओवेसी म्हणाले.
खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अनुच्छेद ३७० वरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एवढंच नाही तर मोदी सरकारचं काश्मीरवर प्रेम आहे पण तिथल्या नागरिकांवर नाही, त्यांना फक्त तिथले भूखंड प्रिय आहेत. त्याचमुळे काश्मीरच्या जनतेचं हित लक्षात न घेता निर्णय घेतले जातात असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. या सरकारला देशात महाभारत घडवायचं आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोदी सरकारचं काश्मीरवर प्रेम आहे, तिथल्य काश्मिरींवर नाही. या सरकारला तिथले भूखंड, जमिनी प्रिय आहेत, तिथे कोण वास्तव्य करतं याच्याशी घेणं देणं नाही. यांना सत्ता प्रिय आहे मात्र न्याय नाही अशी टीका ओवेसी यांनी त्यांच्या भाषणात केली.