‘ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘ करोडो उपेक्षितांचे बलस्थान – प्रा. शिवाजीराव देवनाळे

उदगीर — महिला आणि अस्पृश्य वंचित समाज शोषकाचे साधन बनल्याने हजारो वर्ष ज्ञानावर मूठभराचीच मक्तेदारी ठाण मांडून होती .त्याला सुरुंग लावण्याचे काम फुले दाम्पत्यानी केले .महात्मा ज्योतिबा फुले सोबत सावित्रीमाईंनी शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर घेतला नसता तर अर्धपोटी , अर्धनग्न भीकेवर पोटे जाळणाऱ्या अस्पृश्य व महिलांच्या घरपुढे लालदिव्याच्या गाड्या थांबल्या नसत्या .म्हणून 09ऑगस्ट 2014 रोजी स्थापन झालेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करोडो उपेक्षितांचे बलस्थान ठरले असे गौरवउदगार प्रसिध्द विचारवंत प्रा. शिवाजीराव देवनाळे यानी उदगीर येथे घेतलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 05 व्या वर्धापन दिनी काढले .साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे सांस्क्रुतिक सभागृहात झालेल्या कार्यकर्माच्या अध्यक्षा ग्रीनआर्मीच्या प्रमुख सौ अरुणा भिकाने तर प्रमुख मान्यवर म्हणून बालाजी फुले , प्रा माधुरी नायगावकर , प्रा वनमाला लोंढे , सौ जयश्री जाधव , सौ आशा बेंजरगे , वामन पांचाल , ज्ञानअंकुश चे संपादक वामन अंकुश उपस्थित होते .पुढे बोलताना प्रा. देवनाळे म्हणाले वडिलांच्या सम्पतिचा हिस्सा मिळावा म्हणून हजारो महिलांनी माहेर तोडल्याची उदाहरणे आहेत पण दलित , उपेक्षित वंचित समाजाच्या मुला मुलींना ज्ञान देण्यासाठी माहेर तोडणारी सावित्रीमाई फुले देशातील एकमेव उदाहरण . ज्या विश्रामबाग वाड्यात बहुजनांच्या सावलीनेही कधी प्रवेश केला नाही त्या वाड्यात इंग्रजअधिकारी क्यडिच्या हस्ते फुले दामपत्यानी निर्भीडपणे सत्कार स्वीकारले ते गुरु लहुजी साळवेच्या सहकार्याने . महामानव आमचे दैवतं आहेत. त्यांच्या विचारा बाबत तडजोड नको .ज्या लोकांनी सावित्रीमाईवर शेण चिखलाचा मारा केला त्याचें नातवंडे आज फुले विद्यापीठात पी एच डी च्या पदव्या घेतात हा फुले दांपत्याच्या त्यागाचा विजय आहे .ज्या सरकारंनी , नेते मंडळीने फुले विद्यापीठ निर्मितीसाठी योगदान दिले त्यास आम्ही मुजरा करतो असेही ते म्हणाले या कार्यक्रमास आयोजक सुधाकर दापक़ेकर , मुक्तेश्वर श्रीमंगले , डॉ अनिल भीकाणे , विश्वनाथ मुड्पे , प्रा शशिकांत जाधव , डॉ मारोती कसाब , बालाजी सुवर्णकार , सुधाकर वायचलकर , ज्ञानेश्वर लोहारे , संतोष दुधाळकर , संजय बिदरकर , नारायण घट्रकार , कवी शिवाजी स्वामी , रामराव जाधव , अंकुश सिदगिकर , संजय पांचाल , बालाजी कांबळे , आदी मान्यवर उपस्थित होते .