जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज , भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पाकला ठणकावले

Army Chief General Bipin Singh Rawat on situation in Valley after #Article370Revoked: The bonhomie we had with people in the 70s-80s, we want the same again. We were deployed there, and we used to meet without guns, and if everything goes well, we will again meet without guns. https://t.co/Fr8ChHdK0O
— ANI (@ANI) August 13, 2019
भारतानं जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. आता नियंत्रण रेषेवर पाककडून आगळीक केली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान लडाखच्या जवळ स्कर्डू एअरबेसवर लढाऊ विमाने तैनात करत आहे. पाकच्या या प्रकारानंतर भारताच्या लष्कर प्रमुखांनी थेट इशारा दिला आहे. भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं की, भारतीय लष्कर सावध आहे. जर पाकिस्तानला नियंत्रण रेषेवर येण्याची खुमखुमी असेल तर त्यांनी जरूर यावं. पण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल असा ईशाराही दिला आहे. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर लष्करप्रमुखांनी म्हटलं आहे की, काश्मीरी लोकांसोबत आमचा पहिल्यासारखाच संवाद सुरू आहे. आम्ही त्यांची कोणत्याही शस्त्राशिवाय भेट घेत आहोत आणि भेटत राहू.
पाकिस्तानचे भारतातले माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. भारताने हद्द पार केली तर पाकिस्तानला युद्धाशीवाय पर्याय नाही अशी वल्गनाही बासित यांनी केलीय. या आधी पंतप्रधान इम्रान खान यांनीही संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधीत करताना धमकावण्याचा प्रयत्न केला होता.
बासित म्हणाले, पहिला पर्याय म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सने सुप्रीम कोर्टात लढाई लढावी, दुसरा पर्याय म्हणजे पाकिस्तानने राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर विषय मांडावा, भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवावा आणि हे सगळं यशस्वी झालं नाही तर युद्ध करण्यास मागेपुढे पाहू नये.
केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाही देशाने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर पाकिस्तान आता लडाख सीमेजवळ लढाऊ विमाने तैनात करत असल्याची माहिती पुढे आलीय. भारतीय सुरक्षा संस्था आणि गुप्तचर यंत्रणांची पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर असून लष्कर आणि हवाई दलाला अलर्ट करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.