Pune – Bagluru High way : तब्बल आठ दिवसानंतर संथ गतीने पाण्यातून वाट काढत हलू लागली २५ हजार वाहने…

पुणे बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर आठ दिवसानंतर, सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी सहा वाजल्यापासून अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शिरोलीतून कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी फक्त अवजड वाहतुकीला हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे.
कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेनं येणारी वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. महामार्गाची पाहणी करून दुपारनंतर ही वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे.
कोल्हापूर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी ५ ऑगस्ट रोजी महामार्गावर पाणी आले होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल आठ दिवस या महामार्गावर पाणी असल्याने दोन्ही बाजूस पंचवीस हजाराहून अधिक वाहने अडकून पडली होती. या वाहनधारकांची कोल्हापूरमधील आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी जेवणाची व्यवस्था केली होती. आठ दिवसांनी ही वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.