Jammu & Kashmir : कलम ३७० वरून काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात , समर्थन आणि विरोधही …

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यावरून काँग्रेस नेत्यांचे तळ्यात मळ्यात चालू आहे . काही नेते या बिलाचे स्वागत करीत आहेत तर काही नेते विरोध करीत आहेत . त्यावरून काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. याच कडीत कलम ३७० हटविणे ही राष्ट्रीय समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी दिली. कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडल्यावर अनेक स्थानिक पक्षांनी याला पाठिंबा दिला. या निर्णयाला विरोध दर्शवताना काँग्रेस पक्ष दुबळा ठरल्याचे दिसले. हा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काँग्रेस पक्षातून यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
माझे राजकीय गुरू राम मनोहर लोहिया यांचाही कलम ३७० ला विरोध होता. विद्यार्थी आंदोलनातून आम्ही अनेकसमर्थन दा यासंदर्भात निदर्शने केली होती. कलम ३७० हटवून देशाने मोठी चूक सुधारली आहे. ही राष्ट्रीय समाधानाची बाब असून, हे माझे वैयक्तिक मत आहे, असे जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.
मंगळवारी लोकसभेतही कलम ३७० हटवण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि तिथेही तो मंजूर होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा का देण्यात आला, हा चर्चा करण्याचा मुद्दा आहे. मात्र, या निर्णयामुळे जम्मू काश्मीरच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी नमूद केले. जनार्दन द्विवेदी हे सोनिया गांधी यांच्या जवळचे नेते मानले जात होते. मात्र, सध्या ते काँग्रेसमध्ये सक्रीय नसल्याचे समजते.
ट्विट केले आणि डिलीट केले…
दीपेंद्र हुड्डा यांनीही कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून, २१ व्या शतकात या कलमाला कोणतेही स्थान नाही, असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. कलम ३७० हटवण्याचा निर्णय योग्य आहे. हा निर्णय देशाच्या अखंडत्वासाठी महत्त्वाचा असून, काश्मीरच्या हिताचा आहे. याची अंमलबजावणी शांततेने आणि विश्वासपूर्ण वातावरणात करणे, ही आता सरकारची जबाबदारी आहे, असेही हुड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. काही वेळानंतर हुड्डा यांनी आपले ट्विट डिलीट केले.
मिलिंद देवरांकडून केंद्राच्या निर्णयाचे स्वागत
राहुल गांधी यांच्या विश्वासातील नेते अशी ओखळ असलेले काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यासंदर्भात देवरा यांनी ट्विट केले आहे. कलम ३७० हा मुद्दा उदारमतवादी आणि कट्टरतावादी यांच्या वादात अडकून राहिला. देशातील पक्षांनी आपले वैदेशाने आपली जुनी चूक सुधारली आहे.वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन भारताचे अखंडत्व, काश्मीरमधील शांतता, युवकांना रोजगार आणि काश्मिरी पंडितांच्या न्यायासंदर्भात विचार करणे आवश्यक आहे, असे देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Very unfortunate that Article 370 is being converted into a liberal vs conservative debate.
Parties should put aside ideological fixations & debate what’s best for India’s sovereignty & federalism, peace in J&K, jobs for Kashmiri youth & justice for Kashmiri Pandits.
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) August 5, 2019
दरम्यान, जनार्दन द्विवेदी आणि मिलिंद देवरा यांच्या वेगळ्या भूमिकेनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काश्मीर मुद्द्यावर व्हिप जारी करण्यास नकार देत काँग्रेस पक्षप्रतोद भुवनेश्वर कलिता यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा व पक्षाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देतानाच कलिता यांनी काँग्रेसच्या धोरणांवर सडकून टीका केली.