Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नवी मुंबई : पांडवकडा भागातील धबधब्यावरून पाच पर्यटक गेले वाहून , मुंबई आणि उप नगरात पावसाचा हाहाकर …

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी मुंबईतल्या पांडवकडा भागात असलेल्या धबधबा परिसरातून पाचजण वाहून गेल्याचं वृत्त आहे. यापैकी एकजण जिवंत आहे. बाकी चौघांपैकी एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. पांडवकडा भागात जाण्यास बंदी असूनही नियमांचे उल्लंघन करुन पर्यटक त्यांचा जीव धोक्यात घालतात हे या घटनेमुळे उघड झाले आहे.

Advertisements

खारघर आणि बेलापूरदरम्यान ज्या टेकडी असून या टेकडीला पांडवकडा असे संबोधले जाते. पावसाळ्यात या ठिकाणी खाली पावसाचे पाणी पडत असल्याने नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे. निसर्गाचे हे मोहक रुप अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत असतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या ठिकाणच्या पर्यटकांची या ठिकाणी उपस्थिती असते. मात्र अनेकदा या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे आजही पाचजण वाहून गेले. ज्यापैकी एकाला वाचवण्यात आलं आहे. एका तरुणीचा मृतदेह मिळाला आहे तर इतर चौघांचा शोध सुरु आहे.

Advertisements
Advertisements

शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई आणि मुंबईतील महाविद्यालयातील तरुण-तरुणींचा एक ग्रुप पांडवकडा परिसरात फिरायला गेला होता. बंदी झुगारुन हे सगळेजण तिथे फिरायला गेले. त्यावेळीच ही घटना घडली. नेहा जैन या मुलीचा मृतदेह सापडला आहे. इतर तीन पर्यटकांचा शोध सुरु आहे.

मुंबई, उपनगरे, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल वाहतूक, तसेच रस्ते वाहतुकीवरही परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!