भयानकच !! आईच्या कुशीत निवांत झोपलेल्या तीन वर्षीय चिमूरडीचे अपहरण, बलात्कार आणि शीर केले धडावेगळे !!

उत्तर प्रदेशातील उन्नवमधील बलात्काराच्या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटत असताना आता झारखंडमध्ये आईच्या कुशीत झोपलेल्या एका तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करून तिचे धड शिरावेगळे केल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये घडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांची पोलीस चौकशी सुरू आहे. मात्र मुलीचं शीर धडावेगळं का केलं, याचं उत्तर त्यांनी अद्याप दिलेलं नाही.
या विषयीचे अधिक वृत्त असे कि , रिंकू साहू आणि कैलाश या दोन तिशीतल्या तरुणांनी रेल्वे स्थानकावरून एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण केलं. आईच्या कुशीत निवांतपणे झोपलेल्या मुलीचं अपहरण होत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. यानंतर पोलिसांनी रिंकू आणि कैलासला अटक केली. तेंव्हा त्यांनी कबुली दिली कि , त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि बलात्कारानंतर संबंधित मुलीचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून तो जमिनीत पुरला. आरोपींनी स्वत:हून ही जागा रेल्वे पोलिसांना दाखवली. पोलिसांनी मृतदेहाचे इतर भाग श्वान पथकाच्या मदतीनं शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुसळधार पावसामुळे त्यात त्यांना यश आलं नाही.
रिंकू साहू यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं. २०१५ मध्येही रिंकूने एका लहान मुलीचं अपहरण करुन तिच्या खूनाचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात त्याला तुरुंगवास घडला. मात्र तो जामिनावर सुटला होता . रिंकू आणि त्याचा मित्र कैलासनं दिवसभर पीडित मुलीवर बलात्कार केला. त्यावेळी ती रडू लागल्यानं त्यांना तिचा गळा आवळला. त्यानंतर त्यांनी तिचं शीर धडावेगळं केलं. तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह पोलिसांना रेल्वे स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या झुडूपांमध्ये आढळून आला.