दुष्काळी भागातील १० वी-१२ वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ : शिक्षण विभागाचा अध्यादेश

दुष्काळी भागातील 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा फी माफ करताना यापुर्वी न होणाऱ्या प्रात्यक्षिक,गुणपत्रिका, प्रमाणपत्र अशा सर्व शुल्कांसह "संपूर्ण फी"आता माफ होणार. प्रतिपूर्ती आँनलाईन पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार. आम्ही नवा शासन निर्णय जारी केला. 1/3 pic.twitter.com/h6rLlUhrsj
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) August 1, 2019
दुष्काळी भागातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी माफ न होणारी प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड.आशिष शेलार यांनी केली आहे. शासन निर्णय ही जारी झाला आहे. विशेष म्हणजे ही प्रतिपूर्ती RTGS मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या फीच्या प्रतीपूर्तीचा प्रश्न आला होता. त्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेताली असता दुष्काळी भागातील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीची प्रतिपूर्ती करताना परीक्षा फी माफ केली जाते. मात्र, त्यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क मात्र आकारले जाते, हे शालेय शिक्षणमंत्र्यांनी निदर्शनास आले. त्याचवेळी त्यांनी हे शुल्क सुद्धा माफ करून संपूर्ण फीची प्रतिपूर्ती करण्यात येईल, असे शासनातर्फे सभागृहात जाहीर केले होते.
दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाचे सर्व आमदारांनी स्वागत केले होते. त्यानुसार तातडीने हा निर्णय घेण्यात आला असून त्याचा शासन निर्णय अत्यंत सुस्पष्टपणे जारी करण्यात आला आहे.
महसूल विभागांना दुष्काळी गावांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांचे फोर्म भरण्यापूर्वी जी गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील अशा विद्यार्थ्यांना फोर्म भरते वेळी कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची दक्षता राज्य मंडळाने घ्यावी. विद्यार्थ्यांनी फोर्म भरल्यानंतर महसूल विभागातर्फे जी गावे दुष्काळी म्हणून जाहीर होतील, अशा गावातील विद्यार्थ्यांची माहिती प्रत्येक शासन निर्णयानंतर मंडळाच्या संगणक प्रणालीमधून शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना मंडळामार्फत देण्यात यावी. शिक्षण संचालकांनी विद्यार्थ्यांना आकारण्यात आलेली परीक्षा फीच्या रक्कमेची संपूर्ण प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या/पालकांच्या बँक खात्यात RTGS द्वारे जमा करावी याकरिता आवश्यक सर्व व्यवस्था, ऑनलाईन शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.