‘मिस यू भावांनो’ आणि ‘भेटू परत’ असे स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

जामखेड तालुक्यातील जवळा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन रविवारी दुपारी आत्महत्या केली. आत्महत्या मागील कारण समजू शकले नाही. मात्र त्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटस्अॅपवर ‘मिस यू भावांनो’ आणि ‘भेटू परत’ असा स्टेटस ठेवला होता. जवळा-करमाळा रस्त्याजवळ खंडोबा मंदिर परिसरामध्ये असलेला शेतामध्ये लिंबाच्या झाडाला अशोक संजय मते (वय २०) याचा मृतदेह गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला. गळफास घेऊन आत्महत्या का केली याचे कारण पोलिसांना कळले नाही. त्याच्या पाठीमागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. अशोक यास कबड्डी खेळण्याची आवड होती. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी व्हॉटसअॅपवर मित्रांना ‘मिस यू भावांनो’ व ‘भेटू परत; असा स्टेटस ठेवला होता, हे मात्र उघडकीस आले. या घटने प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.