रुपाली चाकणकर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षा , चित्रा वाघ नंतर तत्काळ नियुक्ती

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर याची घोषणा केली आहे.
चित्रा वाघ यांनी काल उशीरा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर २४ तास होण्याच्या आतच नवीन प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजुला सचिन अहिर यांनी पक्षांतर करुनही त्यांच्या जागी नव्या मुंबई अध्यक्षाची घोषणा मात्र अद्याप केलेली नाही. या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याची कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.