लज्जास्पद : अंध अल्पवयीन मुलीवर नराधम जन्मदात्यानेच केला बलात्कार, पीडिता दोन महिन्यांची गरोदर

मुलगी अंध असल्याचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिकच्या ओझर पोलिसांनी नराधम बापास अटकही केली आहे.
अल्पवयीन पीडित मुलगी दृष्टिहीन असून एका आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. आश्रमशाळेच्या नियमानुसार दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि याच वैद्यकीय तपासणीत ही मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी संबंधित शिक्षकांनी या पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची माहिती दिली. याप्रकरणी नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.