दुःखद बातमी : राज्याचे माजी मंत्री डॉ. शंकरराव राख यांचे निधन, उद्या जालना येथे अंत्यसंस्कार

राज्याचे माजी मंत्री तथा दीपक हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय राख यांचे वडील डॉ. शंकरराव राख यांचे निधन. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी रात्री ८ वाजता रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मृत्यू समयी ते ८५ वर्षांचे होते. काल जालना शहरात आयोजित आ.ह. साळुंके अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते आ . साळूंखे यांचा सत्कारसोहळा संपन्न झाला होता. यावेळी बोलताना त्यांनी आपले समयोचित भाषणात आ. ह . साळुंखे आजच्या काळातील दुसरे महात्मा फुले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले होते. आणि आज रात्री त्यांचे आकस्मिक निधन झाले. महानायक परिवाराची त्यांना भावपूर्ण आदरांजली.