मॉब लिंचिंगबाबत मोदींना पात्र दिल्याचा राग , अनुराग कश्यप यांना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. या दिग्गजांच्या यादीत दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा देखील समावेश होता. अनुरागनं हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याला एका ट्विटर युजरनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अनुरागनं तात्काळ हे ट्वीट मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं असून त्यासंबधी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अनुराग कश्यपनं पत्र सोशल मीडियावर शेअर करताच एका ट्विटर युजर्सनं ‘अलीकडेच मी माझी रायफल आणि बंदुकीची सफाई केली आहे आणि अनुराग आणि मी कधी समोरा समोर भेटतोय याची मी वाट बघतोय.’ असं म्हटलं आहे. अनुरागनं हे ट्वीट मुंबई पोलिसांना फॉरवर्ड केलं आहे. यासंबधी सायबर पोलीस योग्य ती कारवाई करत असल्याचं मुंबई पोलिसांना म्हटलं आहे.
४९ दिग्गजांच्या पत्राला उत्तर देण्यासाठी देशभरातील ६१ सेलिब्रिटींनी खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. या प्रतिभावंतांमध्ये अभिनेत्री कंगना रनौट, लेखक प्रसून जोशी, शास्त्रीय नृत्यांगना आणि खासदार सोनल मानसिंह, वादक पंडित विश्वमोहन भट्ट, चित्रपट निर्माता मधुर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे.
The cyber police station has been sent the account details. Request you to file a police complaint at the your nearest police station for legal action to be initiated.
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) July 25, 2019