News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या, मोदी सरकार कडून आज लोकसभेत येत आहे ‘तीन तलाक’ विधेयक

मोठी बातमी
मोदी सरकार कडून आज लोकसभेत ‘तीन तलाक’ विधेयक (Triple Talaq Bill) आणले जात असून यावर चर्चा झाल्यानंतर ते पास केले जाईल असेवृत्त आहे. त्यासाठी भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. या विधेयकात , तीन तलाक हा गुन्हा मानून हा गुन्हा करणाऱ्याच्या शिक्षेत वाढ करण्यात येणार आहे.
ठाणे: दुकानात झोपलेल्या कामगाराची हत्या करत चोरट्याने लुटला दीड लाखांचा ऐवज; मुंब्रा परिसरातील घटना
योग्य वेळी त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे; ४९ मान्यवरांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राबद्दल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली: १३ वर्षांचा होतो, तेव्हा मीही लैंगिक अत्याचाराला सामोरा गेलो होता – डेरेक ओ ब्रायन, तृणमूल खासदार (पोक्सो सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान)
पोक्सो सुधारणा विधेयक २०१९ राज्यसभेत मंजूर
कोल्हापूर : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर व उपायुक्त मंगेश शिंदे यांची बदली. नितीन देसाई नवे अतिरिक्त आयुक्त.
मुंबईः खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी २९ जुलैपर्यंत मुदतवाढ
दिल्लीः माहिती अधिकार कायदा जाणीवपूर्वक कमकुवत केला जात आहेः सोनिया गांधी यांचा आरोप.
दिल्लीः डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात काय चर्चा झाली याचे स्पष्टीकरण मोदींनी द्यावे, विरोधकांची लोकसभेत जोरदार मागणी.
दिल्लीः पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले. परंतु, काश्मीरबाबत चर्चा केली नाहीः राजनाथ सिंह यांची लोकसभेत माहिती.
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चा जागतिक फिल्म स्कूल टॉप टेनमध्ये समावेश. आशियातून एकमेव फिल्म स्कूल म्हणून समावेश.
अभिनव देशमुख यांना राज्य निवडणूक आयोगाचा “लोकशाही पुरस्कार”