News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भाविकांची लक्झरी बस पलटली; १३ जण जखमी, राष्ट्रीय महामार्गावरील बंद पडलेल्या कामामुळे आणि बस चालकाने दारू पिलेली असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. या बसमध्ये एकूण ३५ भाविक होते व ते सर्व भाविक पुण्यातील पाषाण भागातील रहिवाशी आहेत.
मुंबई : दक्षिण मुंबईत गेल्या दोन तासांत ५२ मिमी पावसाची नोंद; येत्या चार तासांत मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
आसाम, बिहारला पावसाचा तडाखा, 170 जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा, 26-27 जुलैला पडणार मुसळधार पाऊस, कुलाबा वेधशाळेचा अंदाज, खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने प्रत्येक वॉर्डात एक उपअभियंत्याला देखरेखीसाठी नेमले
नाशिक: आदिवासी हक्कांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचातर्फे कळवण येथील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा
धुळे : माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना घरकुल गैव्यवहारप्रकरणी 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई : मराठा आरक्षण :२०१४ साली झालेल्या सरकारी नोकर भरतीतील सुमारे २७०० कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा
नेपाळ: गुलमी जिल्ह्यात भूस्खलन; ११ जणांचा मृत्यू, २ बेपत्ता
बेंगळुरू: हा सर्व राजकारणाचा भाग; सरकार पडल्यानंतर कुमारस्वामींची प्रतिक्रीया
बेंगळुरू: १०५ विरुद्ध ९९ मतांनी गडगडले कुमारस्वामी सरकार
मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी क्राईम ब्रांचकडून आरोपपत्र दाखल.
मुंबई : मराठा क्रांती मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार. किती जागा लढवणार हे अद्याप गुलदस्त्यात.
दिल्लीः जी-शिखर परिषेदत भारत-पाकिस्तान या दोन देशांत काश्मीर प्रश्नावर चर्चा नाही.