विधानसभेपूर्वी घोषणांचा पाऊस, मंत्रिडळाने घेतले महत्त्वाचे निर्णय

विधानसभेच्या निवडणुकांसाठी महिनाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यमंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका लावलाय. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात आहेत. तर लोकप्रिय निर्णयांचे मार्गे तातडीने मोकळे केले जात आहेत. आचारसंहिता लागण्याच्या आधी महत्त्वाचे निर्णय घेणं राहून जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कार्यालय सध्या युद्ध पातळीवर काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात झालेल्या कॅबिनेट बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय
१. मिरा भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयास मान्यता
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
मिरा भाईंदर-वसई-विरार
पोलिस आयुक्तालयास मान्यता pic.twitter.com/Bfup81Eidf— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2019
२. नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग.
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका
अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग pic.twitter.com/wFGgtxabek— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2019
३. चूलमुक्त महाराष्ट्र, धूरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार.
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
चूलमुक्त महाराष्ट्र, धूरमुक्त महाराष्ट्र
करण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार pic.twitter.com/OoHGXCV6n5— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2019
४. गायमुख ते शिवाजी चौक मुंबई मेट्रो १० ला मान्यता
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
गायमुख ते शिवाजी चौक
मुंबई मेट्रो १० ला मान्यता pic.twitter.com/feum4Lb15M— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2019
५. वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेट्रो ११ ला मान्यता
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई मेट्रो ११ ला मान्यता pic.twitter.com/q3mnlHW5U6— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2019
६. कल्याण-डोंबिवली-तळोजा मुंबई मेट्रो १२ ला मान्यता
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
कल्याण-डोंबिवली-तळोजा
मुंबई मेट्रो १२ ला मान्यता pic.twitter.com/qc6fsfa5Ht— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2019
७. भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापनेसाठी अतिरिक्त प्राधिकरण
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापनेसाठी
अतिरिक्त प्राधिकरण pic.twitter.com/jiZLsxJ7in— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2019
८. ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिसिनल प्लांटस’ (एनआयएमपी) साठी 50 एकर जागा
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिसिनल
प्लांटस’ (एनआयएमपी) साठी 50 एकर जागा pic.twitter.com/wgjborugxx— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2019