सिडको फ्री होल्ड बाबत सिडको अध्यक्षांना जाब विचारणार – सावे

औरंगाबाद – सिडको लीज होल्डवरुन फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव सिडकोने शासनाला पाठवल्यानंतर त्यावर सिडको अध्यक्षांनी कोणतेही भाष्य करणे चुकीचे याबाबत सोमवारी आपण सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना जाब विचारणार आहोत.अशी माहिती उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी दिली.
सिडको हडको नागरी विकास कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र दाते पाटील यांनी मे १९९८ पासुन या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत सिडको प्रशासनाला याबाबत प्रस्ताव तयार करुन पाठवण्याचे आदेश दिले होते. म्हणून सिडको प्रशासनाने लीज होल्ड चे फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे.त्या पत्राची प्रत सिडको हडको नागरी कृती समितीला पाठवली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सिडको मालमत्ता फ्री होल्ड करत असल्याचा पुनरुच्चार औरंगाबादेतील जाहिर सभेतून केला होता. राज्यमंत्री अतुल सावे यांनी या संदर्भात सर्वच प्रसारमाध्यमांना जाहिरातीही दिल्या होत्या.त्यामुळे राज्यमंत्री सावे यांनी सिडको अध्यक्ष ठाकूर यांच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे.असे शेवटी सावे म्हणाले.