महावितरणच्या मुख्य अभियंत्याला मागितली ८ लाखांची खंडणी,तिघांना बेड्या

औरंगाबाद – महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांना ८ लाख रु.खंडणी मागणार्या तिघांना सिडको पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या.
उदय अरुण पालकर(४६) अमोल सांडू साळवे(३५) दोघेही रा. सिडको , भानुदास शंकर मोरे(३१) रा. जयभवानी नगर अशी अटक आरोपींची नावे आहेत.वरील पैकी पालकर हा वरील दोन साथीदारांना सोबत घेऊन माहितीच्या अधिकारात महावितरणाची विविध माहितीकाढून ती प्रसिध्द न करण्यासाठी गणेशकर यांना ८ लाखांची मागणी करंत होता.या प्रकरणाची फिर्याद गणेशकर यांनी सिडको पोलिसांना दिली.त्यानंतर गणेशकर यांनी दोन हजारांच्या आठ नोटा कागदा सोबंत जोडून आरोपींना महावितरणाच्या कारकूनामार्फत पंचासमक्ष रविवारी कार्यालयात बोलावून दिल्या या नोटा स्विकारत असतांना पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.वरील कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब आहेर पोलिस कर्मचारी नरसिंग पवार, सुरेश भिसे यांनी पार पाडली.