‘चांद्रयान-२’ मोहिमेची तयारी पूर्ण, उद्या दुपारी अवकाशात झेपावणारं

‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणासाठी सर्व तयारी झाली असून उद्या अवकाशात हे यान झेप घेण्यासाठी सज्ज झाले असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले आहे. आज संध्याकाळपासून प्रक्षेपणासाठी काऊनडाऊन सुरु होईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. तांत्रिक कारणांमुळे ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. मात्र, यातील सर्व तांत्रिक अडचणी दुरुस्त केली असून उद्या प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष सिवन यांनी दिली आहे. उद्या सकाळी म्हणजे मध्य रात्री २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चांद्रयान २’ अवकाशात झेप घेणार आहे.