News Update : रामविलास पासवान यांचे भाऊ खा. रामचंद्र पासवान यांचे निधन

एलजेपीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे भाऊ रामचंद्र पासवान यांचे निधन झाले असल्याची माहिती रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनी दिली आहे. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते दरम्यान ह्र्दयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. १० जुलै रोजी त्यांना हृदय विकाराचा पहिला धक्का आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. बिहारच्या समस्तीपूर मतदार संघातून ते खासदार म्हणून निवडून आले होते.
रामचंद्र पासवान यांची समस्तीपुर लोकसभा मतदार संघातून निवडून येण्याची हि दुसरी टर्म आहे . त्यापूर्वी ते १९९९ मध्ये रोसारमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. २००४ मध्येही ते याच मतदार संघातून विजयी झाले होते . हि त्यांची चौथी टर्म होती. ते ५७ वर्षांचे होते . लोकजनशक्ती पार्टीचे लोकप्रिय नेते म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती.
इतर बातम्या : एक नजर
औरंगाबादः कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस, दोन वनरक्षक वाहून गेले. पुरामुळे जैतापूर-जळगावचा संपर्क तुटला.
मुंबईः भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी आज दादर येथील चैत्यभूमिवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (CPI) सरचिटणीसपदी डी. राजा यांची नियुक्ती.
विंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ पुढीलप्रमाणे… विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव
विंडीज दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ पुढीलप्रमाणे… विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ पुढीलप्रमाणे… विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुनाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी
राज्यात वीज कोसळून ३ ठार, पावसाचा जोर पुन्हा वाढला
औरंगाबाद: १६० जणांना घेऊन विमानतळावरून हज यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना
झारखंडः बेदम मारहाण केल्याने चार जणांचा मृत्यू. पिचकारी गावातील दुर्दैवी घटना.
मुंबईः बोगस मतदान ओळखण्यासाठी मतदान कार्डशी आधार कार्ड जोडण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सोनभद्रमधील पीडित कुटुंबाची भेट घेणार.