विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न करु : नवनियुक्त कुलगुरु डॉ.प्रमोद येवले

प्रभारी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्याकडून स्विकारली सुत्रे
विद्यापीठातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन कायापालट करण्याचा तसेच नावलैकिक उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही नवनियुक्त कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सुत्रे डॉ.प्रमोद गोविंदराव येवले यांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी स्विकारली. यावेळत कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांनी त्यांच्याकडे पदभार दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सुत्रे डॉ.प्रमोद गोविंदराव येवले यांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी स्विकारली. यावेळत कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांनी त्यांच्याकडे पदभार दिला. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश करपे, डॉ.राहुल मस्के, कुलसचिव डॉ.साधना पांडे, कुलगुरुंच्या पत्नी ज्योती येवले, मुलगा प्राजक्त येवले, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, परीक्षा मंडळ संचालक डॉ.गणेश मंझा यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती. महात्मा फुले सभागृहात हा सोहळा झाला.
कुलगुरुपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, विदर्भ व मराठवाडा या भागातील प्रश्न ब-यापैकी सारखे आहेत. या भागातील विद्याथ्र्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले उतुंग कामगिरी करु शकतात. मा.राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी दिलेली कुलगुरुपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडु. विद्यापीठ हे काही एकटा कुलगुरु नेऊ शकत नाही. तर सर्व सहका-यांच्या साथीने विद्यापीठाचा नावलौकिक उंचावू अशी ग्वाहीही डॉ.येवले यांनी दिली.
हा तर माझा सन्मान : डॉ.देवानंद शिंदे
दीड महिन्याच्या कार्यकाळात खुप गोष्टी शिकायला मिळाल्या, सर्वांचे सहाकर्य मनापासून मिळाले, असे मावळते कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे म्हणाले. ज्या विद्यापीठात शिकलो त्याच विद्यापीठाचे सर्वोच्च पद मिळणे हा माझा सन्मान होता. शिवराय व बाबासाहेब या महामानवांच्या नावाने चालणा-या विद्यापीठाला सांस्कृतिक अदान-प्रदान होण्यासाठी प्रयत्न करु असेही डॉ.शिंदे म्हणाले. प्रारंभी विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ.साधना पांडे, ‘बामुटा‘तर्फे डॉ.रत्नदीप देशमुख, डॉ.राम चव्हाण, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्फे डॉ कैलास पाथ्रीकर, पर्वत कासुरे, कुलगुरू कार्यलयातर्फे नजमा खान, रवींद्र बनकर यांनी सत्कार केला. यावेळी विविध अधिकारी मंडळाचे सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.