औरंगाबाद: लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच नवविवाहितेची आत्महत्या

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संजीवनी तेजस देशमुख (वय-22) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून संजीवनीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. फुलंब्री तालुक्यातील वदोड कान्होबा गावात ही घटना घटली आहे.
सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून संजीवनीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा संजीवनीच्या नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या संजीवनीचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. हॉस्पिटलबाहेर मृताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याने परिसरात तणाव पसरला आहे.