News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …एमआयएमला हव्यात विधानसभेच्या १०० जागा …

औरंगाबाद: छावणी हद्दीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मिसबाह कॉलनीत गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार
औरंगाबाद : विधानसभेला एमआयएम 100 जागा लढवण्यास इच्छुक, जागा वाटपाबाबत प्रकाश आंबेडकर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार, सूत्रांची माहिती
भारत-पाकिस्तानच्या शिष्टमंडळात करतारपूर साहिब कॉरिडोरवर मुद्द्यावर वाघा सीमेवर बैठक सुरू
नगरः मनमाड-कोपरगाव-येवला रोडवर वारकऱ्यांच्या पीकअप गाडीला अपघात, चार वारकरी जखमी. जखमींवर येवल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
आंध्र प्रदेशः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहकुटुंब तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले