लग्नाच्या वरातीत भरधाव ट्रक घुसल्याने ८ जण ठार , ६ जखमी

भरधाव ट्रक लग्नाच्या वरातीत घुसल्याने ८ जण ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून ट्रक चालक फरार झाला आहे. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. लखीसराय येथील हलसी बाजारातून लग्नाची वरात जात होती. बिशनपूर गावातून ही वरात आली असल्याचं समजतं. त्यावेळी भरधाव ट्रक लग्नाच्या वरातीत घुसला. ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे वरातीतील १०-१५ लोक ट्रक खाली चिरडले गेले. त्याआधी हा ट्रक परिसरातील विजेच्या खांबाला जाऊन धडकला होता. या दुर्घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला. घटनेत ८ जण जागीच ठार झाले असून ६ जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.