ICC Cricket World Cup 2019 : भारताच्या पराभवाबद्दल बोलला विराट कोहली ….

ICC Cricket World Cup 2019 मध्ये सेमीफायनलच्या सामन्यात २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना चांगली फलंदाजी करता आली नाही त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला . दरम्यान सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटनं पराभवाची कारणं सांगितले. विराटने भारतीय संघाचे कौतूक केले आणि केवळ , ४५ मिनीटांच्या खेळीमुळं आपण हरलो असे सांगून त्याने जडेजा आणि धोनीच्या खेळाचेही कौतूक करत पुढे म्हटले कि , वाईट वाटत आहे. जेव्हा तुम्ही संपुर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करता आणि शेवटच्या ५ मिनिटांत तुम्ही स्पर्धेबाहेर होता”.
विराट कोहलीने सामन्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांचेही कौतूक केले. याबद्दल बोलताना विराट म्हणाला की, “न्यूझीलंडनं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केली, अर्थात जो संघ चांगली कामगिरी करतो तोच जिंकतो. त्यामुळं न्यूझीलंडनं आज चांगली कामगिरी केली आणि ते फायनलमध्ये गेले.
ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्विकारावा लागला. सेमीफायनलमध्ये जडेजा आणि धोनी वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. धोनी आणि जडेजा यांनी शतकी भागिदारी केली, मात्र भारताला विजय मिळवता आला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे भारताची आघाडीची फलंदाजी. सामन्याचा पहिला दिवस पावासामुळं वाया गेल्यानंतर आज न्यूझीलंडनं भारताला २४० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ २२१ धावांवर बाद झाला. धोनी ४९ धावांवर खेळत असताना दोन धावा काढण्याच्या नादात ५० धावांवर बाद झाला आणि भारताच्या हातातून सामना निसटला. त्याआधी रवींद्र जडेजा ७७ धावा करत बाद झाला होता. गुप्टिलनं मोक्याच्या क्षणी विराटला धावबाद केले, आणि सामना बदलला.