Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वक्तव्य भोवले : राहुल गांधी कोकेन घेतात, सुब्रम्हण्यम स्वामींच्या वक्तव्याविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे कोकेन घेतात, या वक्तव्यामुळे भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी हे अडचणीत आले आहेत. स्वामी यांच्या विरुद्ध काँग्रेसने उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर छत्तीसगडमध्येही स्वामींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वामी हे आपल्या वक्तव्यांमुळे कायम वाद निर्माण करतात. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध त्यांनी अनेकदा सनसनाटी आरोप केले आहेत.

Advertisements

पंजबाचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना डोपिंग टेस्ट सक्तिची केली होती. त्यावरून देशपातळीवर चर्चा सुरू आहे. त्याच विषयावर बोलताना स्वामी यांनी हे सनसनाटी विधान केलं होतं. राहुल गांधी हे डोपिंग टेस्टसाठी तयार आहेत का? असा सवालही स्वामी यांनी केला होता.

Advertisements
Advertisements

उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या कोतवाली नगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव पी.एल. पुनिया यांनी दिलीय. स्वामी यांच्याविरुद्ध कडक करवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!