बंजारा समाजाचे नेते राजपाल सिंग राठोड, चुनीलाल जाधव यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

वंचित बहुजन आघाडीने सर्व समाजातील वंचितांच्या हक्कासाठी घेतलेल्या भूमिकेचे बंजारा समाजाने मनापासून स्वागत केले असून, आगामी विधानसभेत पूर्ण ताकदीने वंचितआघाडी सोबत उभे राहण्याचा संकल्प त्यांनी आंबेडकर भवन येथे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत केला. फार पूर्वीपासून देशात व्यवसाय निमित्ताने ही भटकी जमात सर्वत्र स्थायिक होत जीवन जगत आहे .आपल्या मुलभूत संविधानिक हक्कासाठी ते झगडत आहेत. विविध सुविधांपासून त्यांना वंचित ठेवले आहे. भटके समाज म्हणून त्यांच्या काही विशेष स्वतंत्र समस्या आहेत. बंजारा समजाला आतापर्यंत सत्तेतदेखील सहभागी करून घेतले नाही. वास्तविक बंजारा समाज मोठ्याप्रमाणावर महाराष्ट्रात स्थायिक आहे.
या पार्श्वभूमीवर बंजारा समाज आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात एकजूट झाला आहे. राज्यातील सर्व बंजारा समजाच्या विविध संघटनांनी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत येण्याचा निर्णय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत घेतला असून, त्याचा एक भाग म्हणून औरंगाबाद येथे राज्यातील हजारो बंजारा एकत्र येत मेळाव्याच्या माध्यमातून संकल्प करणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील बंजारा समाजाचे राजपाल सिंग राठोड, मोरसिंग राठोड, संदेश चव्हाण, अंबरसिंग चव्हाण, आत्माराम जाधव, प्रो. पीटी चव्हाण , हिरासिंग राठोड, चुनीलाल जाधव, रविकांत राठोड, उल्हास राठोड, अविनाश राठोड आदी उपस्थित होते.