News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

मुंबईत संततधार सुरूच; मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील शाळांना आज सुट्टी; शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची माहिती
#Mumbairains Would like to announce and confirm that tomm 2nd July 2019 has been declared as holiday ,for all schools( public & private ) in Mumbai , Navi Mumbai, Thane , kokan areas ! Stay safe ! @mybmc @Dev_fadnavis @CMOMaharashtra
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) July 1, 2019
जयपूर – मुंबई स्पाइस जेट SG 6237 विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. त्यानंतर काही अंतरावर जाऊन थांबले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई विमानतळावर स्पाइस जेटचे विमान धावपट्टीवर उतरत असताना हा प्रकार घडला. मात्र, यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली असून पर्यायी धावपट्टीवर विमाने उतरवली जात आहेत. काही आंतरराष्ट्रीय विमानांचा मार्ग बदलण्यात आला असून या विमानांना बंगळुरु, अहमदाबाद सह दुस-या विमानतळावर वळविण्यात आले आहे.
खराब हवामानामुळे शिर्डीतील पाच उड्डाणे रद्द, प्रवाशांचा मुक्काम : १८० प्रवासी घेऊन परत दिल्लीच्या दिशेने टेकऑफ करण्याच्या तयारीत असताना उड्डाणासाठी व्हीजीबीलीटी मिळत नसल्याने दिल्लीला जाणाऱ्या या विमानाचेही टेकऑफ रद्द झाले असून या विमानातील प्रवाशांची विमान कंपन्यांनी शिर्डीत राहण्याची व्यवस्था केली आहे. मंगळवारी टेकऑफसाठी व्हीजीबीलीटी मिळताच दिल्लीचे विमान उडेल. दिल्ली, भोपाळ, बंगलोर आणि मुंबई येथे जाण्यासाठी चारशेच्यावर प्रवाशांनी आपली तिकिटे बुक केलेली होती. मात्र खराब हवामानाचा फटका बसल्याने ही विमाने शिर्डीत न उतरता परत गेली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
पुणे : आंबेगाव, सिंहगड कॅम्पस येथील भिंत कोसळली. यात अडकलेल्या 9 लोकांना अग्निशमन दलाने बाहेर काढले असून आणखी काहीजण अडकल्याची शक्यता आहे.
औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मुलाखती; अंतिम यादीत डॉ. के. वी. काळे, डॉ. धनंजय माने, डॉ. योगानंद फुलारी, डॉ. प्रमोद येवले, डॉ. होलंबे यांचा समावेश
मुंबईः राष्ट्रीय कृषि उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
मुंबईः राज्यातील मराठा समाजाला १६ टक्क्यांऐवजी शिक्षणात १२ टक्के तर नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचे सुधारणा विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर
नाशिकः शहरात पावसामुळे रस्ते जलमय; जागोजागी वाहतूक कोंडी
मालेगाव (नाशिक) : माॅब लिंचिंगच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ जमियत उलमा ए हिंदच्या वतीनं मूक मोर्चा
जालना : सराफा व्यापारी पिता-पुत्रास लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; औरंगाबाद येथून तीन जण ताब्यात.
हिंगोली : वसमत येथे टोळीयुद्धातून शिवा सवदा या तरुणाची हत्या; श्रीकांत सांडे हा गंभीर जखमी.
मुंबईः डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांची आता जामीन मिळवण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव
औरंगाबाद: पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांच्या हस्ते स्वत: रक्तदान करून ‘डॉक्टर्स डे’निमित्त घाटी रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन
नवी दिल्लीः केंद्रीय शैक्षणिक संस्थान विधेयक २०१९ लोकसभेत संमत
कोल्हापूरः कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या.
दिल्लीः ऑक्टोबर महिन्याआधी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका नाहीतः अमित शहा यांची राज्यसभेत माहिती.
पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्थाानिक विद्यार्थ्यांचा ७० टक्के कायमचः उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची विधान परिषदेत माहिती.
कोल्हापूर: सकल मराठा समाजाकडून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी योगदान देणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजी राजे छत्रपती, खासदार नारायण राणे यांच्या सह मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार
नागपूर: काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी दिला पदाचा राजीनामा
औरंगाबादः संभाजीनगरवरून तेढ निर्माण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक
जालना: पावसामुळे जाफराबाद ते भोकरदन पूल वाहून गेला; कोणतीही जीवित हानी नाही.