Good News : अनुदानित गॅस सिलिंडर उद्यापासून स्वस्त !!

विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. १ जुलैपासून विनाअनुदानित एलपीजीचा दर १००.५० रुपयांनी घटणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर-रुपये एक्सचेंज दरात झालेल्या बदलाच्या परिणामामुळे एलपीजीचा दर घटला आहे.
बदललेल्या दरानुसार, ७३७.५० रुपयांचा सिलिंडर ६३७ रुपयांना मिळणार आहे. अनुदानित सिलिंडरच्या ग्राहकांना देखील १०० रुपये कमी मोजावे लागणार आहेत. अनुदानित सिलिंडरच्या ग्राहकांना प्रति सिलिंडर १४२.६५ रुपये अनुदान मिळाल्यानंतर एका सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत ४९४.३५ रुपये होणार आहे.
अनुदानित सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना सिलिंडर घेताना बाजारभावानुसार घ्यावा लागतो आणि नंतर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होते. अनुदानित सिलिंडर घेणाऱ्यांना एका वर्षात १२ सिलिंडरवर अनुदान मिळतं. महिन्याभरापूर्वी घरगुती गॅसच्या दरात ४ टक्के वाढ झाली होती आणि प्रति सिलिंडर २५ रुपये दर वाढला होता. दर घटल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.