नगर- सोलापूर रस्त्यावरील विचित्र अपघातात दोन ठार, चार जखमी

नगर-सोलापूर रस्त्यावर आज सकाळी तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघतात दोन प्रवासी जागीच ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी नगर-सोलापूर रडोवरील वाटेफळ गावाजवळ हा अपघात झाला. पहाटेच्यावेळी सोलापूर महामार्गावर पिकअप गाडी नगरकडे येत होती. तर दोन कंटेनर नगरकडून सोलापूरकडे जात होते. वाटेफळ गावाजवळ दोन कंटेनरमध्ये पिकअप गाडी येऊन हा अपघात झाला. त्यात पिकअपचा चक्काचूर झाला.
या विचित्र अपघातात अमोल रामदास गारुडकर आणि शालन रामदास गारुडकर हे दोघे मायलेक ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सुरू आहेत. हे सर्वजण शिगोंदातील घोगरगाव येथील रहिवासी आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.