Maharashtra : राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी , मुंबईतही तुफान पाऊस

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या महाराष्ट्राला पावसाने आता दिलासा दिला असून राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . दरम्यान कालपासून मुंबई शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. तर पावसामुळे मुंबई, पुणे सारख्या शहरात शॉर्ट सर्किट , भिंत कोसळणे, झाड पडणे अशा दुर्घटना घडताना पाहायला मिळत आहे.
राज्यातील पावसाच्या बातम्या….
वीज पडून यवतमाळमध्ये तिघांचा मृत्यू : यवतमाळ जिल्यात वीज पडून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू. दोन शेतकऱ्यांसह एका १२ वर्षीय मुलाचा समावेश. नेर, दिग्रस आणि उमरखेड तालुक्यातील शनिवारी दुपारच्या घटना. दादाराव लुकाजी राठोड (५५) रा. मारवाडी, चंद्रभान दमडू चव्हाण (३५) रा. आरंभी आणि प्रकाश मानतुटे (१२) रा. निंगनूर अशी मृतांची नावे आहे. या तिन्ही तालुक्यात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला.
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. गेल्या २४ तासात ७० मिलीमीटर तर दिवसभर ५० मिलीमीटर पाऊस
कोल्हापुरात मुसळधार पाऊस; राजाराम बंधारा पाण्याखाली गेला असून शाहूवाडी परिसरात दिवसभर संततधार पावसामुळे नद्या भरून वाहत आहेत. राजाराम बंधारा आज सायं. ६.३० वा.पाण्याखाली गेला. या वेळी बंधाऱ्याजवळ १७ फूट इतकी पाण्याची उंची होती.
अहमदनगरमधील जामखेड शहरात जोरदार पावसाला सुरुवात
ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले, ठाणे जिल्ह्यात सरासरी १९१ मिमी पाऊस, धरणातील पाणीसाठ्यात वाढ
पवनाधरणक्षेत्रात जोरदार पाऊस ;पाणलोट क्षेत्रात घसघशीत वाढ
पनवेलमध्ये नदीत वाहून गेलेली कार बाहेर काढण्यात यश
वसईत दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीवरील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला असून १२ गावांचा संपर्क तुटला आहे.
कोकण विभागात सरासरी १६०.८० मिमी. पावसाची नोंद
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस, पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात