Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पबजी गेम खेळण्यास मनाई केल्याने लहान भावाने खुपसली मोठ्या भावाच्या पोटात कात्री ….

Advertisements
Advertisements
Spread the love

आईच्या मोबाइलवर पबजी गेम खेळण्यास मनाई केल्याने १५ वर्षीय अल्पवयीन धाकट्या भावाने आपल्या १९ वर्षीय थोरल्या भावाच्या पोटात कैची खोपसून निर्घृण हत्या केली आहे. मोहम्मद हुसैन मोहम्मद अच्छे शाह असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपीला शांतीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisements

भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौहान कॉलनी, मनपा शाळा क्रमांक ७० जवळीस चाळीत शनिवारी  ही घटना घडली आहे. आरोपी मोहम्मद फहाद याने आईचा मोबाइल घेऊन त्यावर तो ‘पबजी’ गेम खेळत होता. मोहम्मद हुसैन याने त्यास गेम खेळण्यास मनाई केली. एवढेच नाही तर मोहम्मद फहाद त्याच्या जवळील मोबाइल फोन हिसकावून घेतला. याचा राग मनात ठेऊन मोहम्मद फहाद याने हुसैनशी हुज्जत घातली. हुज्जतीचे पर्यवसन हाणामारीत झाले. फहाद याने घरातील कैचीने हुसैन याच्या पोटावर छातीवर सपासप वार करुन त्यास गंभीर जखमी केले. त्याला जखमी अवस्थेत स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!