मुस्लिम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाचा मुद्दा आणि मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मागणी झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातात, मात्र उच्च न्यायालयाने सांगूनही मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यास फडणवीस सरकारने टाळाटाळ केल्याचा आरोप अबू आझमी यांनी केला. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.
मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची माहिती दिली. यानंतर मुस्लिम समाजाचे आमदार वारिस पठाण आणि अबू आझमी यांनी मुस्लिमांना आरक्षण देताना भेदभाव केल्याचा आरोप केला.
यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुस्लिमांना वेगळे आरक्षण दिले जाऊ शकत नाही. भारत हा सर्व जाती धर्मांचा देश आहे. यामध्ये हिंदू-मुस्लिम, ख्रिश्चन येतात. मुस्लिम तरुणांना ईसी-बीसी कोट्यातूनच आरक्षण मिळणार असून यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही, असे स्पष्ट केले. तसेच एका विद्यार्थ्याचे उदाहरण देत त्याला या कोट्यातूनच आरक्षण मिळाल्याचे सांगितले.