खून आणि बलात्काराच्या आरोपावरून आजन्म कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला हवाय ४२ दिवसांचा पॅरोल !!

खून आणि बलात्काराच्या आरोपावरून आजन्म कारावासाची शिक्षा भोगणारा डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला ४२ दिवसांचा पॅरोल हवा असून त्याने तास अर्ज केला आहे . या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. राम रहीम यांच्यावतीने ४२ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्यानंतर तरूंग अधिक्षकांकडून जिल्हा प्रशासनास पत्र देखील पाठवण्यात आले आहे.
हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया येथील शेतीच्या कामांसाठी पॅरोलची मागणी केल्यानंतर डेरा सच्चा सौदा संप्रदाय प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांना ४२ दिवसांचा पॅरोल देण्यात येणार असल्याची चिन्ह आहेत. १८ जून रोजी यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या पत्रात गुरमीत यांची तरूंगातील वर्तवणुक ठीक असल्याचे तसेच त्यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन देखील केले नसल्याचे सांगण्यात आले होते.
याप्रकरणी हरियाणाचे मंत्री कृष्ण लाल पंवार यांनी याबाबत सांगितले की, कोणत्याही कैद्यास दोन वर्षांनंतर पॅरोलचा अधिकार आहे. गुरमीत राम रहीम यांनी यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार तरूंग अधिक्षकांनी जिल्हा प्रशासनास पत्र पाठवून उत्तर मागवले आहे. आता यावर निर्णय घेण्याचे काम जिल्हा प्रशासन व पोलिसांचे आहे.