Malegaon Bomb Blast : साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना सुनावणीला कोर्टात हजर रहावेच लागणार, अनुपस्थितीची सवलत नाकारली

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी, भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कोर्टात उपस्थित राहण्यापासून सवलत मिळावी म्हणून केलेला विनंती अर्ज आज विशेष एनआयए कोर्टाने कोर्टाने फेटाळला. दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपींनी दर आठवड्याला कोर्टात हजेरी लावावी असे आदेश कोर्टाने दिले असून त्यातून सवलत मिळावी, अशी विनंती करणारा अर्ज साध्वी प्रज्ञा यांनी कोर्टात केला होता. दरम्यान, ६ जून रोजीही प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत साध्वी प्रज्ञान कोर्टात हजर राहिल्या नव्हत्या.
खासदार झाल्याने मला दररोज संसदेत उपस्थित राहावे लागत आहे, असे नमूद करताना सुरक्षा व्यवस्था, प्रकृती अस्वास्थ्य आणि मुंबई व भोपाळमधील अधिक अंतर, अशी कारणे पुढे करत साध्वी प्रज्ञा यांनी कोर्टात दर आठवड्याला हजेरी लावण्यापासून सवलत मागितली असता कोर्टाने प्रज्ञा यांची ही विनंती फेटाळून लावली व केवळ आजच्या गैरहजेरीपुरती मुभा दिली.