Maharashtra : उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ , २८ विध्येकांवर होईल चर्चा

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाईल, १३ नवी विधेयकं, १५ प्रलंबित विधेयकं अशी एकूण २८ विधेयकं अधिवेशनादरम्यान चर्चेला घेतली जातील. दुष्काळाविषयी देखील या अधिवेशनात चर्चा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि , ‘नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर मोठ्या उत्साहात सत्तारुढ पक्ष या अधिवेशनाला सामोरा जात आहे. अर्थसंकल्प मांडला जाईल. राज्याला पुढे नेणारा, पुरोगामी अर्थसंकल्प अर्थमंत्री मांडतील. राज्य सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलेले अनुदान, चारा छावण्या यांची माहिती सरकारकडून दिली जाईल.’ विरोधकांच्या टीकेचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. सत्ताधाऱ्यांना आभासी पक्ष म्हणणाऱ्या विरोधकांनी आधी स्वत: आभासी जगातून बाहेर यावे, असे ते म्हणाले.